Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मनपा कर्मचाऱ्यांच्या बायोमॅट्रीक हजेरीसाठी ३६ यंत्रांची होणार खरेदी
    जळगाव

    मनपा कर्मचाऱ्यांच्या बायोमॅट्रीक हजेरीसाठी ३६ यंत्रांची होणार खरेदी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 14, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक हजेरीसाठी नवीन ३६ मशिन खरेदी केल्या जाणार असून यापुढे सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे बायोमॅट्रीक हजेरीद्वारेच होणार आहेत.

    महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापासून बायोमॅट्रीक हजेरी लागू करण्यात आली आहे. परंतु बायोमॅट्रीक मशिनची संख्या कमी प्रमाणात असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार अद्यापही झालेला नाही, काही कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक मशिन मध्ये नोंदणी नसल्यामुळे त्यांच्या हजेरी लागू शकलेल्या नाहीत तर, काही कर्मचाऱ्यांचे थंम्ब मशिन मध्ये रेकॉड झालेले नाहीत, तसेच रेकॉर्ड झालेल्या हजेरींची पडताळणी करण्यासाठी आस्थापणा

    विभागात पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन ऑक्टोंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. दांडी बहाद्दरांना बसणार चाप म्हणून या अडचणी टाळण्यासाठी महापालिकेकडून ५० बायोमॅट्रीक मशिनची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ३६ मशिन खरेदी केले जाणार आहेत.

    सध्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता बायोमॅट्रीक मशिन अपुर्ण पडत आहेत. म्हणून नवीन बायोमॅट्रीक मशिन खरेदी करण्यात येणार आहेत. या मशिन मध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचा थम्ब घेतला जात नसेल तर, चेहरा देखील स्कॅन करण्याची व्यवस्था आहे. तसेच नेट चालत नसेल तर, मोबाईचा हॉटस्पॉटवर देखील हे मशिन चालू शकेल व विज पुरवठा खंडीत झाला असल्यावर देखील मशिन चालू राहील.

    महापालिकेच्या आयुक्तांनी काही युनिट कार्यालयांमध्ये भेट दिल्या असता त्यावेळी काही दांडी बहाद्दर आढळून आले होते. त्यानंतर नगरसेवक चेतन सनकत यांनी आरोग्य विभागातील दांडीबहाद्दरांचा पराक्रम समोर आणला होता. तसेच सहाय्यक आयुक्त अश्विनी भोसले यांनी देखील नुकता काही दांडीबहाद्दरांचा भंडाफोड केला असून त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला आहे. म्हणून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी व महापालिकेचा पगार घेवून काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी बायोमॅट्रीक हजेरी सुरु केली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #manpa hjalgaon jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif