Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»तुम्ही कुणाला मत दिले? व्होटिंग संपताच फोन !
    राजकारण

    तुम्ही कुणाला मत दिले? व्होटिंग संपताच फोन !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 22, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मतदान झाल्यानंतर सोमवारी काही मिनिटांत आलेल्या एका फोनने मतदारांना चक्रावून सोडले आहे. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या फोनने मतदारांना त्यांनी कोणत्या पक्षाला मतदान केले हे विचारत पर्याय सांगून त्यानुसार मोबाइल फोनवरील अंक दाबण्यास सांगण्यात येत होते. मतदारांचा कल जाणून घेण्याचा आटापिटा नेमके कोण करत आहे, याची जोरदार चर्चा मतदारांत रंगली असून याविरोधात राजकीय पक्ष तक्रार करण्याच्याही तयारीत असल्याचे कळते.

    मतदान झाल्यानंतर नेमके मतदान कोणाला केले याविषयी नाक्यानाक्यावर, कार्यालयात आणि ऑफिसात चर्चा रंगते. परंतु सोमवारी पार पडलेल्या मतदानानंतर एक वेगळाच प्रकार मतदारांना अनुभवायला मिळाला. अनेक मतदारांना त्यांच्या फोनवर +91 186-5031889 या क्रमांकावरून फोन आला. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या फोनच्या माध्यमातून मतदारांना कोणत्या पक्षाला मतदान केले असे थेट विचारण्यात आले. तसेच, ज्या पक्षाला मतदान केले त्याचे उत्तर देण्यासाठी फोनवरील 1 ते 4 असे क्रमांकाचे बटण दाबून उत्तर देण्यासही सांगण्यात आले.

    मतदारांना आलेला या फोनचे कॉलर आयडी पतियाळा, पंजाब असे दिसून येत असले तरी अनेक मोबाइल धारकांनी त्याला स्पॅम रिपोर्ट केल्याचेही निदर्शनास आले. मी सहसा अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनला उत्तर देत नाही, परंतु मी घाईगडबडीत तो फोन उचलला. त्यावेळी समोरून महिलेच्या आवाजात तुम्ही कुणाला मतदान केले असा थेट प्रश्न विचारण्यात आला, मी पुढे ऐकले असता एक-एक करत सर्व पक्षांची नावे घेऊन उत्तर देण्यास सांगण्यात आले, हे खूपच चक्रावून सोडणारे होते, अशी माहिती एका वाचकाने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.

    याविषयी राजकीय पक्षांकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली असून अशाप्रकारे नेमके कोण सर्वेक्षण करून घेत आहे, असा प्रश्न एका राजकीय नेत्याने विचारला. याविषयी पक्षांतर्गत चर्चा करून याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात येईल, असेही नेत्याने स्पष्ट केले.

     

    Loksabha Election 2024 Mumbai Vote
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!

    September 4, 2026

    तटकरे कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करणार होते!

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif