मराठी भाषिक व्यक्तीचा अपमान केल्याबद्दल मनसेकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

पुणे ;- येथील स्टार गेज अँड टेलिव्हिजन अकॅडमी घोले रोड पुणे येथे कार्यरत असणाऱ्या मराठी भाषिक व्यक्तीचा प्रमाण करून त्यांना शिवीगाळ केल्याचा परकर येथे घडला असून याबाबत दोघानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे जनहित कक्ष व विधी विभाग सरचिटणीस अॅड. किशोर शिंदे आणि अध्यक्ष, पुणे शहर नरेंद्र चंद्रकांत तांबोळी यांनी डेक्कन जिमखाना पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, स्टार गेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमी घोले रोड पुणे येथील आस्थापनेतील अधिकारी अमन परदेशी, आभिषेक भारद्वाज, पूजा जालंदर यांनी त्याच्या ऑफीस मधील निखिलेश जामनेकर यांना उद्देशपूर्वक अपमान करून शिवीगाळ केली येथे मराठीत बोलायचे नाही असे प्रक्षोभक बोलून त्या ठिकाणची शांतता भंग होईल असे कृत्य केले.

निखिलेश जामनेकर हे मराठी भाषिक आहेत हे व्यवस्थापनातील सर्व या अधिकाऱ्याना माहिती होते. तरीही त्यांनी श्री. निखिलेश जामनेकर यांना जाणीवपूर्वक त्रास दिला आहे श्री. अमन परदेशी व अभिषेक भारद्वाज, पूजा जालंदर यांनी या ठिकाणी सर्व कामगारांना तुम्ही मराठी भाषा का बोलता ? माझ्या समोर मराठीत बोलायचे नाही अश्या प्रकारे नेहमीच बोलून अश्या प्रकारे भाषा स्वतंत्र, अभिव्यक्ती स्वतंत्र यावर बंधने घालून मराठी भाषेचा मराठी अस्मितेचा भावना दुखावण्याचा हेतूने बुद्धीपरस्पर उद्देशाने अनेक वेळा बोलत असतात.

या ठिकाणच्या सर्व कामगारांना असे बोलून कामगार वर्गामध्ये शत्रुत्व द्वेष भावना निर्माण करणारी विधाने अनेक वेळा करीत असल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विधी विभागाकडे करण्यात आलेल्या आहेतअमन परदेशी, अभिषेक भारद्वाज, पूजा जालंदर यांनी जाणीवपूर्वक अपमान करून असे बोलून दाखवणे यामुळे कामगारांच्या भावना दुखवण्याचा व बुद्धीपरस्पर हेतुपूर्वक उद्देशाने शब्द वाक्य उच्चारुन त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे. यांची कृती भारतीय दंड संहिता कायद्यातील तरतुदीचा भंग करणारी आहे.असे निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.