जळगाव :- माहेरून रोख पाच लाख रुपये व तीन लाखांचे दागिने न आणल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकणी सासरच्या पाचजणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठेतील माहेर असलेल्या दीक्षा यांचा विवाह नाशिक येथील आली. अमित रामदेव पंडित यांच्याशी झाला. त्यानंतर काही दिवसांनी या विवाहितेचा पैसे व दागिन्यांसाठी शारीरिक व मानसिक छळ केला जाऊ लागला.
माहेरून पाच लाख रुपये रोख व तीन लाखांचे दागिने आणावे म्हणून तिला मारहाण करण्यासह स्वयंपाक घरातील साहित्याने चटके देऊन जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
तशी फिर्याद विवाहितेने शनिपेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पती अमित पंडित, सासू शारदा रामदेव पंडित, दीर, नणंद यांच्यासह चुलत सासरे प्रकाश भगवानदास पंडित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील करीत आहेत.