Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»गोडसे-वाजेंमध्ये चुरस; शांतिगिरींचेही भवितव्य ‘ईव्हीएम बंद’ !
    राजकारण

    गोडसे-वाजेंमध्ये चुरस; शांतिगिरींचेही भवितव्य ‘ईव्हीएम बंद’ !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 22, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    नाशिक लोकसभा मतदारसंघात सिडको आणि घास बाजारातील किरकोळ वादाच्या घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. सायकांळी सहापर्यंत मतदानाने 61 टक्क्यांचा आकडा पार केल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, ‘वंचित’चे करण गायकर, अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांसह 31 उमेदवारांचे भविष्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले आहे.

    गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का काहीअंशी वाढल्याचे चित्र आहे. सन 2019 मध्ये 59.48 टक्के मतदान झाले होते. यंदा मतटक्का वाढल्याने याचा फायदा कोणाला याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, ओसरलेली मोदी लाट, ‘दामाजीपंता’च्या अभावातही मतांचा टक्का वाढल्याने उमेदवारांची धडधड वाढली आहे. नाशिक लोकसभेसाठी 1,910 मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान पार पडले. या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे, शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे रिंगणात आहेत. सोबतच ‘वंचित’कडून करण गायकर यांच्यासह अपक्ष शांतिगिरी महाराजही रिंगणात असले, तरी मुख्य लढत ही वाजे आणि गोडसे यांच्यातच होत आहे.

    गोडसे यांनी हॅटट्रिक करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती, तर दुसरीकडे ठाकरे गटाने असली-नकलीचा मुद्दा लावून धरत निवडणुकीत रंगत आणली होती. गेल्यावेळी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. यंदा मात्र राजकीय परिस्थिती बदलली. वरकरणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना दिसत असला, तरी या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एका बाजूला, तर उर्वरित पक्ष महाविकास आघाडीसोबत असल्याचे चित्र होते. मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. शहरासह ग्रामीण भागासह सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 51.07 टक्के मतदान झाले. सायंकाळी सहानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. नाशिक पूर्वमधील अनेक केंद्रांवर तर रात्री साडेआठनंतरही रांगा असल्याचे चित्र होते. त्यामुळे शेवटच्या एक तासात साधारणत: दहा टयांच्या आसपास मतदान होण्याची शक्यता असल्याने यंदाचे मतदान 61 टक्क्यांचा आकडा पार केल्याने वाढलेल्या मतटक्क्याचा फायदा कोणाला होईल, याची आता चर्चा सुरू झाली आहे.

    उमेदवारांची वाढली धडधड

    नाशिकमध्ये सन 2014 मध्ये 58.82 टक्के मतदान झाले होते, तर सन 2019 मध्ये 59.48 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकापांसून मतदानाचा उत्साह वाढलेला आहे. यंदा हाच मतटक्का 61 टक्क्यांपार होणार असल्याचे चित्र आहे. गेल्या वेळेस असलेली मोदी लाट यंदा मात्र ठळकपणे दिसून आली नाही, तर उमेदवारांनी ‘दामाजीपंता’बाबत हात आखडता घेतल्याने झोपडपट्ट्यांमधील मतदान कमी झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, तरीही मतटक्का वाढल्याने उमेदवारांची धडधड वाढली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Hemant Godse Loksabha Election 2024 Nahsirk Nashik loksabha Rajabhau Waje Shiantigiri Maharaj
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif