शरद पवारांनी फेरविचारासाठी मागितली २-३ दिवसाची मुदत – अजित पवार

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्याची घोषणा केल्यानंतर त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. दरम्यान सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकी नंतर अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करू, असे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी दोन-तीन दिवसांची मुदत मागितली आहे. अजित पवार म्हणाले की, शरद पवारांनी पक्षात सुरू असलेली चर्चा थांबवा असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितले आहे.

शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे पवार म्हणाले. यासोबतच आगामी रणनीतीसाठी वरिष्ठ नेत्यांचे पॅनल बनविण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.