पहूर मध्ये गारपीटीच्या तडाख्यात 135 मेंढ्यांचा जागीच मृत्यू

0

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पहूर (pahur) मध्ये गारपीटीच्या तडाख्यात 135 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, 75 मेंढ्या धरणात वाहून गेल्या, अनेक घरांची पघझड, शेती पिकांचे प्रचंड नुकसान, नामदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अमित मित्तल, तहसीलदार अरुण शेवाळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी गारपीट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या तडाख्यात परिसरातील जामनेर मार्गावरील सोनाळा फाट्याजवळ नांदगाव येथून आलेल्या शेतात बसलेल्या मेंढपाळांच्या सुमारे 135 मेंढ्या गारपीटीच्या तडाख्यात मृत्युमुखी पडल्या असून 75 मेंढ्या धरणात वाहून गेल्याचे सांगण्यात आले.

गेल्या पाच ते सहा दिवसापासून परिसरात तसेच पिंपळगाव गोलाईत शिवारात खोकर तळा या ठिकाणी शेतकरी देवराज राजाराम पाटील, यांच्या शेतात बानगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील भगवान सदाशिव गोळेकर, सिताराम सदाशिव गोळेकर, प्रल्हाद सदाशिव गोळेकर, शांताराम सदाशिव गोळेकर, अरुण सदाशिव गोळेकर, पंकज सदाशिव गोळेकर या सहा मेंढपाळ बांधवांचे असून काल सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या गारपीट चक्रीवादळ व अवकाळी पावसाच्या तडाख्यात त्यांच्या वाड्यातील 800 ते 900 मेंढ्या असून त्यापैकी 135 मेंढ्या गारपिटीच्या तडाख्यात मृत्युमुखी झाल्या तर 75 मेंढ्या शेजारी असलेल्या नाल्यातून वाहून गेल्याचे सांगण्यात आले. असे एकूण 30 ते 35 लाखांचे नुकसान झाल्याचे भगवान गोळेकर या मेंढपाळ बांधवाने सांगितले.

घटनास्थळी सोनाळा येथील तलाठी धीरज जैन, पहुर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जयलाल राठोड जळगाव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सदाशिव शिसोदे, तहसीलदार अरुण शेवाळे यांनी तातडीने मेंढ्यांचे शवविच्छेदन करून पंचनामा केला. घटनास्थळी नामदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अमित मित्तल (Collector Amit Mittal) यांनी घटनास्थळाची पाहणी करून मेंढपाळ बांधवांची तसेच मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांची पाहणी करून आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले की या सर्व पंचनामे करून शासकीय स्तरावर गारपीटीच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रतिमेंढी चार हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात येणार असल्याचे सांगितले, येत्या तीन ते चार दिवसात पहुरसह परिसरातील सर्व नुकसान झालेल्या शेतीचे पिकांचे तसेच घरांची पडझड झालेल्या या सर्वांचे पंचनामे येत्या तीन ते चार दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले ,तसेच सर्वांना शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास सुरुवात केली खरी पण प्रत्यक्षात त्यांना झालेल्या नुकसानीचे भरपाई केव्हा मिळेल हाच खरा मोठा प्रश्न आहे.

मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा या ऊक्ती प्रमाणे अनेकांचे संसार मोडून पडले असले तरी माणुसकी जागवत अनेक हात पुढे येत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.