खडकदेवळा येथे धरणात बुडून २३ वर्षीय युवकाचा मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल १ मे रोजी उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोविंद समाधान मोरे (२३) रा. वाडे-गुढे ता. भडगाव हा युवक २७ एप्रिल रोजी खडकदेवळा ता. पाचोरा येथील मावशीकडे आला होता. दरम्यान ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोविंद हा धरणात पोहण्यासाठी गेला होता. मात्र गोविंद यास पाण्यास अंदाज न आल्याने त्याचा बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची घटना गावात कळाल्यानंतर परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी गोविंद याचा शोध घेतला असता गोविंदचा मृतदेह आढळून आला नाही. १ मे रोजी होडीच्या साहाय्याने पुन्हा शोध मोहिम सुरु केली. यादरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास गोविंद याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे. मयत गोविंद मोरे यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, चार बहिणी असा परिवार आहे. घरातल्या एकुलता एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.