आता जळगाव शहरास अमृत योजनेद्वारा पाणीपुरवठा; जुनी पाईपलाईन होणार बंद…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कवयित्री बहीणाबाई जलकुंभ झोन क्र. ११ या अंतर्गत येणाऱ्या:- बजरंग कॉलनी, दशरथ नगर, श्रीराम कॉलनी, के.सी नगर, तळेले कॉलनी, शंकरराव नगर, ज्ञानदेव नगर, काशीनाथ नगर, सदाशिव नगर, द्वारका नगर, गिताई नगर, कावेरी हॉटोल परीसर, विठोबा नगर, प्रेमचंद नगर, सदोबा नगर, योगेश्वर नगर, इत्यादी एकूण 45 कॉलन्यांच्या परीसरात दि 5/5/2023 पासून अमृत योजनेच्या नवीन जलवाहीन्यांद्वारा नियमीत पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार असून, जुनी पाईप लाईन या पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त या जलकुंभाच्या झोन अंतर्गत येणाऱ्या खेडी गाव व आजू‌बाजूच्या परीसरास दि 12/05/2023 नंतर नियमीत पाणी पुरवठा अमृत जलवाहीन्यांद्वारा सुरू करण्यात येणार आहे. या प्रमाणे संजय नेमाडे, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, यांनी कळवले आहे. तसेच ज्या नागरीकांनी अद्यापपर्यंत अमृत नळसंयोजना घेतलेले नसेल त्यांनी त्वरीत अमृत नळ संयोजन जोडणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे ज्यांचेकडे अमृत नळ संयोजन देणात आले आहे त्यांची सदर अमृत मळ संयोजनाची जोडणी घरातील नळास करून घ्यावी, या प्रमाणे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.