शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी…

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर, सर्वत्र खळबळ उडाली असून, हे प्रकरण शांत होत नाही तोवर आता शिवसेना (उबाठा गट ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी एका फोन कॉल वरून देण्यात आली असल्याची माहिती स्वतःसंजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे.

सुनील राऊत म्हणाले, माझ्या मोबाइलवर कॉल करून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीत, रोज सकाळी सकाळी माध्यमांसोबत बोलणे बंद करा, नाहीतर त्याला गोळी घातली जाईल, असे बोलण्यात आल्याचे सुनील राऊत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.