संत चोखामेळा तीर्थक्षेत्र लवकरच नावारूपाला येणार !

0

 

देऊळगाव राजा / बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील मेव्हूणाराजा येथील संत चोखामेळा यांची जन्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर असून, लवकरच त्या क्षेत्राला भव्यदिव्य स्वरूप येणार असून, तीर्थक्षेत्रासोबत पर्यटन सुद्धा आकर्षक होण्याची चिन्हे आहेत. तर १४ जानेवारी २०२४ चा जन्मोत्सव हा नेत्रदीपक ठरणार.

“ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा / काय भुललासी वरलिया रंगा” विठ्ठलाच्या मस्तकी शोभुन असणारा दिसणारा प्रथम पसंतीचा विठ्ठल भक्त संत चोखामेळा यांचे जन्मगावी मेव्हूणाराजा बऱ्याच वर्षीपासून  तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वप्रथम तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य बाबुराव नागरे, उषा खेडेकर, जि.प अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,   माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, मा.आ. तोताराम कायंदे  यांनी प्रत्येकाने आपापल्या जमेल त्या पध्दतीने काही न काही दिले, तर तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सुद्धा साडेचार कोटींची तरतूद चा शब्द दिला. मात्र वेळेनुसार निधी अभावी  थांबलेले काम २०२० मधे तत्कालीन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आणि तत्कालीन आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे विशेष बाब म्हणून ४ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव आर्थिक विकास आराखडा तयार केलेला मीटिंग दरम्यान मंजूर करवून घेतला.

दोन ते अडीच वर्षे लोटली त्याचा थांगपत्ता लागेना, म्हणून विद्यमान आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मागोवा घेत पुन्हा त्या आराखड्याचा मार्ग मोकळा केला. सबंधित विभागाशी आमचे दैनिक लोकशाही प्रतिनिधी प्रभाकर मांटे यांनी संपर्क केला असता समाज कल्याण अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास निधी स्थलांतरित केला आहे. पुनश्च सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते काबरे सह भाले यांनी लवकरच अकोला येथे जाऊन विकास आराखड्यातील भव्य प्रवेशद्वार, सुसज्ज भक्त निवास, रस्ते नाल्या  भव्यदिव्य मंदिर, विद्युतीकरण, सुशोभीकरण अशा भरपूर सुविधा असणार असून तीर्थक्षेत्रासह पर्यटन क्षेत्र सुद्धा नावारूपाला येणार असल्याचे बोलल्या जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.