लोहारा प्रवासी थांबा झाला कचरा डेपो…

0

 

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

लोहारा गाव हे परिसरातून मुख्य बाजारपेठेचे व मुख्य दळणवळण व्यवस्थेचे गाव व केंद्र संबोधले जाते, ही ऐतिहासिक परिस्थिती आजही आहे. या गावाला लांब पल्ल्यांच्या आगाराच्या बसेस मुक्कामी यायच्या. त्यावेळेला काही अंशी ही अतिक्रमण नव्हते. उदरभराणाची काही कुटुंबीयांना चिंताक्रांत होऊन पडलेले पसंत तर व्यापार व व्यवसायात अल्पशा प्रमाणात वृद्धी होत होती, हवा तसा विकास गावाचा झालेला नव्हता. तरीपण प्रवासी वाहनाची तांबी म्हणून राष्ट्रीय परिवहन महामंडळाने ओळख करून घेतलेली होती. त्याच अनुषंगाने बसेस लोहारा गावी मुक्कामी यायच्या, त्यांना जागेअभावी वाहनावर येणारे चालक वाहक सोयीचे असलेल्या मोकळ्या जागी बसेस उभ्या करून, सकाळी आपल्या ठरल्या वेळेत बस स्थानकात येऊन प्रवासी घेऊन जावे लागत असे. अशा या मिनी आगाराचा प्रवासी थांबा अदृश्य होऊन कचरा डेपो निर्माण झाला आहे. बाजूला उभ्या राहणाऱ्या प्रवासी व व्यावसायिक धारक यांना दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. सुज्ञ किंवा बाजूचा एखादा व्यवसायधारक जर बोलला इथे लघुशंका करू नका किंवा घाण टाकू नका, त्यावर काही असंवेदनशील लोक हमरीतुमरीवर येतात, याला आजीमाजी लोकप्रतिनिधी जबाबदार असून, कचरा डेपोला लाजवेल अशाप्रमाणे या प्रवासी थांब्याची अवस्था झालेली आहे. याबाबत अनेक वेळा माध्यमांनी यावर प्रकाश टाकला पण जबाबदार गेंड्यांची कातडी परिधान केलेल्यांनी दखल घेतलेली नाही. कचरा डेपोतील तरी घाण ही नाश केली जाते, पण येथील घाण दिवसेंदिवस वाढत जातेय याला परत परत म्हटले गेले तरी जबाबदार आहेत ते संबंधित व आजी-माजी लोकप्रतिनिधी… हे वावगे ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.