ठाकरेंच्या सभेत घुसानाऱ्याला राऊतांनी थेट बक्षिसच जाहीर केले…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची उद्याच्या दिवशी सभा होणर आहे. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते संजय राऊत हे जळगावात दाखल झाले आहेत. मात्र या सभेआधीच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कमालीची “तू तू मै मै”. बघायला मिळत आहे. “चौकटीत बोला अन्यथा, तुमच्या सभेत घुसू”, असा धमकी वजा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला होता. यावर आज पत्रकारांशी बोलतांना “सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचे बक्षिस घेऊन जा” असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माजी आमदार दिवंगत आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. नंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. यासभेचं आयोजन आर.ओ. पाटील यांची कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केलं आहे.

संजय राउत यांच्याबरोबर ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर थेट धमकीवजा इशारा दिला आहे. “गुलाबराव पाटील यांनी मस्तीची भाषा करू नये. सभेत घुसलात तर परत जाणार नाही. ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी आहेत. आम्हाला त्यांच्या सभेत घुसता येत नाही का? त्यामुळे दादागिरीची भाषा करू नये”, असा इशारा अंबादास दानवे यांनी गुलाबराव पाटील यांना दिला आहे. परवानगी घेऊन लावलेले बॅनर्स असतील काढता कामा नये. परवानगी शिवाय लावले असतील तर ठीक आहे, मी अधिक माहिती घेतो, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांच्या म्हणण्यात तथ्य असले तरी हाच ठाकरी बाणा आहे जे जातील त्याला जाऊ द्या पुन्हा शिवसेना मोठी करू. ज्यांचे मन तिकडे आणि शरीर इकडे होते. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आमदारांना न अडवण्याची भूमिका घेतली हाच खरा ठाकरी बाणा, असल्याचं दानवे यांनी सांगितले.

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीतून सकारात्मक काही होत असेल तर चांगलेच आहे. कारण उद्धव ठाकरे यांचीच इच्छा आहे. फक्त शिवसेनेसोबत नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतही सूत्र जमावे. अजित पवार यांचे पुण्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पोस्टर लागले असतील तर चूक काय? कुणालाही मुख्यमंत्री होता येऊ शकते ही कार्यकर्त्यांच्या मनातली भावना असते.

Leave A Reply

Your email address will not be published.