एक वर्षाच्या संसारात झाल असं काही… विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल…

0

 

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

गर्भपाताला आळा बसण्यासाठी त्याविरोधातील कायदे सरकारने कठोर केले आहेत. मात्र अजूनही अनेक ठिकाणी त्याबद्दलच्या घटना पहावयास मिळत असतात. अश्यातच जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपात करून घे असा दबाव टाकून हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याने या मानसिक त्रासातून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जालना शहरात ही घटना घडली आहे.

प्रतीक्षा पवार असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे. प्रतीक्षाचं एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिने एका वर्षांपूर्वी प्राध्यापक असलेल्या परमेश्वर पवार याच्या सोबत विवाह केला होता. दरम्यान रात्री प्रतीक्षा हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर प्रतीक्षा हिच्या वडिलांनी तालुका पोलीस ठाण्यात आरोप केला की, ‘प्राध्यापक परमेश्वर पवार आणि त्यांच्या कुटुंबाकडून प्रतीक्षाला गेल्या काही महिन्यांपासून हुंडासाठी त्रास दिल्या जात होता’. तिला दिवस गेल्याने तिला गर्भपात करण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकला जात असल्याने प्रतीक्षाने या मानसिक त्रासातून आत्महत्या केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी प्राध्यापक परमेश्वर पवार याच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलीस तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.