शिंदे गट गोंधळलेला, उगाच ओरडून फायदा नाही- संजय राऊत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गट (Shinde Group) तयार करून सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळेच वळण लागले. यादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यातच शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर आरोपांची फैरी डागली आहे.

 ते गोंधळलेले आहेत

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की,  शिवसेनेतून गेलेला शिंदे गट सेनेतून बंडाची विविध कारणे देत आहे; पण ते गोंधळलेले आहेत. त्यात कधी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) नाराजी तर कधी राष्ट्रवादी (NCP) निधी देत नव्हता म्हणतात. पक्षातील काही लोक बाहेर पडले म्हणून आम्हीही गेलो असेही सांगत आहेत. आता तर माझ्यामुळेच पक्ष सोडला असे ते सांगत सुटले; पण या सर्वांची आता कार्यशाळा घ्यायला हवी. ते का गेले हे मला माहिती आहे, उगाच ओरडून फायदा नाही.   हे नेमके कशासाठी शिवसेनेतून गेले? जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन ते गेले असतील, तर 2019 ला हिंदुत्ववादी भाजपने (BJP) शब्द फिरवला हे त्यांनाही माहित आहे.

ते रोज नवी कारणे देताय

राऊत म्हणाले, बंडखोर जे बोलत आहेत त्यांनी एकदा नक्की बाहेर पडण्याचे कारण काय हे त्यांनी ठरवावे. ते रोज नवी कारणे देत आहेत. मी शासकीय, प्रशासकीय कामात कधीही नव्हतो, उद्धव ठाकरेंसोबत जास्त दिसलो नाही. गोंधळू नका, तूम्ही का ओरडत आहात. अनेक वर्षे शिवसेनेसोबत काम करणारे नेते आहेत, त्यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली. येत्या काही काळात अनेक पक्षात अनेक निर्णय होतील, कामांना गती मिळेल. भावना गवळीही (Bhavana Gawali) उत्तमच होत्या पण त्यांच्या कायदेशिर प्रक्रीयेत त्या गुंतल्या असल्याने त्यांना फारसा वेळ देता येत नव्हता. आदेश काढण्यापासून प्रतोदपदाचे काम करताना अडथळे होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.

संदीपान भुमरेंनी माझ्यासमोर लोटांगण घातलं

तसेच राऊत म्हणाले, संदीपान भुूमरे (Sandipan Bhumre) निवडून आले आणि सामना (Saamana) कार्यालयात माझ्यासमोर त्यांनी लोटांगण घातले. सीसीटीव्हीत फुटेजही दाखवू शकतो. तेच आता उद्धव ठाकरेंवर आगपाखड करीत आहेत. संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्यामागे उद्धव ठाकरे कसे ठाम उभे राहीले हे सर्वांना माहित आहे.

भाजपचे लोकही पवारांचे कौतुक करतात

दरम्यान शहाजी बापू पाटील (Sahaji Bapu Patil) यांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले की, या देशातील सर्वच नेते शरद पवारांच्या (Sharad pawar) कार्याबद्दल बोलतात. खुद्द पंतप्रधान मोदीही (PM Modi) बोलतात. भाजपचे लोकही पवारांचे कौतूक करतात. महाराष्ट्रातील नेत्यांचे आम्ही कौतूक करायचे नाही तर कुणाचे करायचे? शिवाजी बापूंच्या डोंगर हाॅटेल, झाडीच्या संवादासमोर कैलास गोरंट्याल यांनी लावलेले वाक्य तूम्ही नीट ऐका.

 

Leave A Reply

Your email address will not be published.