रोहित शर्माने एका शतकातून मोडले तीन विक्रम

0

नवी दिल्ली:-  अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात रोहित शर्माने सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. तब्बल ४० वर्षांपासून हा विक्रम कोणीच मोडू शकला नव्हता. रोहितने आज वर्ल्ड कप स्पर्धेत वेगवान १००० धावा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार असे वर्ल्ड रेकॉर्ड मोडताना गोलंदाजांची अवस्था दयनीय केली. रोहितने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ६ शतकांचा सचिनचा विक्रम मोडला.

रोहितने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद १००० धावांच्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला आणि जगातील फलंदाजांमध्ये त्याने संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. रोहितने १९ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना डेव्हिड वॉर्नरशी बरोबरी केली. पण, सचिन तेंडुलकर ( २०), एबी डिव्हिलियर्स आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आला आणि त्याने गांगुलीचा १००६ धावांचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५४* षटकारांचा विक्रमही रोहितने नावावर करताना ख्रिस गेलचा ५५३ षटकारांचा विक्रम मोडला.

रोहित आज कोणालाच जुमानत नव्हता आणि त्याने पूल शॉटने मारलेला षटकार सर्वांना अचंबित करणारा ठरला. लोकेश राहुल चेंडूकडे पाहतच राहिला. आयसीसी व्हाईट बॉल स्पर्धांमध्ये रोहितने ७०* षटकार खेचून एबीचा (६९) विक्रम मोडला. ख्रिस गेल १२७ षटकारांसह अव्वल स्थानी आहे. रोहितची फटकेबाजी पाहून इशानचाही मूड झाला अन् त्यानेही हात मोकळे केले. रोहितने ६३ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह १०० धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील हे त्याचे ७वे शतक ठरले आणि असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. भारताकडून वर्ल्ड कप स्पर्धेतील हे सर्वात वेगवान शतक ठरले.

https://twitter.com/cricketworldcup/status/1712111170704871801/photo/1?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1712111170704871801%7Ctwgr%5E404b25ec53f2ce71164197fa1ad4d7ea7b4e719f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.saamtv.com%2Fsports%2Frohit-sharma-broke-sachin-tendulkars-record-of-centuries-in-the-world-cup-bbj88

Leave A Reply

Your email address will not be published.