धक्कादायक; नाशिकमध्ये डॉक्टर महिलेस दगडाने ठेचून संपवले

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिक मधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉक्टर महिलेचा पती आणि सासऱ्याने मिळून हत्या केल्याचा थरकाप उडवणारा प्रकार नाशिक मध्ये घडला आहे. दोन आठवड्यांपूर्वी हत्या करुन अपघात असल्याचा बनाव बाप-लेकाने रचला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकच्या नांदगाव येथील डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे यांचा अपघाती मृत्यू असल्याचं आधी समोर आलं होत. मात्र त्यांचा मृत्यू अपघाती नसून पतीसह सासऱ्यानेच दगडाने ठेचून त्यांची हत्या केल्याची फिर्याद नांदगाव पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाग्यश्री यांचा पती डॉ. किशोर नंदू शेवाळे व त्याचे वडील नंदू राघो शेवाळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे अपघाताचा बनाव उघडकीस आला असून, जवळजवळ १५ दिवसांनी आरोपींच कृत्य समोर आलं आहे.

पत्नीचा अपघात झाल्याची माहिती
डॉ. भाग्यश्री यांचा २७ सप्टेंबरला मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाला असून त्या अपघातात त्या मृत्युमुखी पडल्याची माहिती पती डॉ. किशोर शेवाळे याने चाळीसगाव पोलिसांना दिली होती. त्यानुसार चाळीसगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत गुन्ह्याचा तपास नांदगाव पोलिसांकडे सोपवला होता. पती किशोर शेवाळे याला दवाखाना बांधायचा होता. त्यासाठी डॉ.भाग्यश्रीने माहेराहून २५ लाख रुपये आणावे, असा तगादा पतीने लावला होता. मात्र भाग्यश्री यांनी ही मागणी फेटाळून लावली म्हणून बाप-लेकाने कट रचून भाग्यश्री यांची हत्या केली, असा आरोप डॉ. भाग्यश्री यांच्या भावाने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.