रोहित शर्माने षटकार मारत मोडला ख्रिस गेलचा विक्रम

0

नवी दिल्ली;-भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार मारत वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने आज अफगाणिस्तानविरुद्ध चार षटकार लगावत जगातला नंबर वन सिक्कर किंग ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने ५५१ डावात ५५३ षटकार लगावण्याचा विक्रम केला होता. ख्रिस गेलचा हाच विक्रम रोहित शर्माने मोडला आहे.

विश्वचषकात सुरु असललेल्या आज अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात रोहित शर्माने खणखणीत षटकार लगावला. रोहितने षटकार लगावत विश्वचषकातील १००० धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने १९ डावात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात रोहितने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकात २ षटकार आणि ७ चौकाराचा सामावेश आहे.
रोहित ठरला सिक्सर किंग

रोहित शर्मा ख्रिस गेलचा विक्रम मोडत सिक्सर किंग झाला आहे. अफगाणिस्तानच्या विरोधात आक्रमकपणे तीन षटकार लगावत आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम केला आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४७२ डावात ५५५ षटकार ठोकले आहेत. तर ख्रिस गेलने ५५१ डावात ५५३ षटकार लगावले आहेत.
सर्वाधिक षटकार लगावणारे टॉप तीन फलंदाज कोण?

रोहित शर्मा – ४७२ डाव – ५५५ षटकार

ख्रिस गेल – ५५१ डाव – ५५३ षटकार

शाहीद आफ्रिदी – ५०८ डाव – ४७६ षटकार
विश्वचषकात सर्वाधिक जलद अर्धशतक पूर्ण करणारे फलंदाज कोण?

२६ चेंडू – सचिन तेंडूलकर (२००७)

३० चेंडू – रोहित शर्मा (२०२३)

Leave A Reply

Your email address will not be published.