रितिका पाटीलची 10 लाख रुपयांपर्यंतच्या “निधी प्रयास” अनुदानासाठी निवड

0

 

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शिरपूर येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयची रितिका अनिल पाटील या तृतीय वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थिनीची तिने संकल्पित केलेल्या “गर्भधारणा नियोजन किट” विकसित करण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे उद्योजकता विकास मंडळामार्फत १० लाख रुपयांपर्यंतच्या “निधी प्रयास” अनुदानासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी दिली.

गर्भधारणा नियोजन किट हे दुहेरी उद्देशाचे किट आहे, जे ओव्हुलेशन दिवस शोधते, जे गर्भधारणा होण्याची संभाव्य शक्यता दर्शवते आणि गर्भधारणा देखील ओळखते. ओव्हुलेशन शोधण्याचे सध्या अल्ट्रासाऊंड तंत्राद्वारे निदान केले जाते, आणि ते खूप महाग आहे. त्याला पर्याय म्हणून या गर्भधारणा नियोजन किटचा उपयोग करता येणार आहे. सदर गर्भधारणा नियोजन किटची अपेक्षित किंमत फक्त ६० ते ८० रुपये असेल. त्यामुळे हे संशोधन समजतील सगळ्या वर्गाला उपयोगी ठरणार आहे. सदर निधी प्रयास साठी भारताच्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत विकासाचे ध्येय पुढे नेण्यासाठी समर्पित असलेल्या भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्टार्टअप उष्मायन केंद्र असलेल्या भाऊ इन्स्टिट्यूट च्या समितीच्या समोर रितिका पाटील हिने तिचे सादरीकरण प्रस्तुत केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अश्या पद्धतीचे अनुदान मिळवणारे एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालय एकमेव महाविद्यालय आणि रितिका पाटील हि एकमेव अंडरग्रेजुएट विद्यार्थिनी आहे. या कामी रितिका हिस महाविद्यालयाच्या फार्माकोग्नोसी विभागाचे प्रा. चेतन भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी रितिका हिने सांगितले कि, महाविद्यालयात असलेले संशोधनप्रिय वातावरण आणि महाविद्यालयातर्फे “समाज उपयोगी संशोधनाला” नेहमीच प्रोत्साहित केले जाते आणि त्यातून हे यश प्रत झाले आहे.

सदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उद्योगपती चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू ड़ॉ. के. बी. पाटील, सर्व संचालक यांनी त्यांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.