विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आ. चंद्रकांत पाटलांची आगर प्रमुखांशी चर्चा…

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मुक्ताईनगर मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बसेस उपलब्ध होत नसल्याच्या संदर्भात आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय नियंत्रक जळगाव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसेच आगारात नवीन बसेस उपलब्ध करणे संदर्भात देखील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चेन्ने यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.

मुक्ताईनगर मतदार संघातून शहरात शाळा-कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता खेड्यापाड्यातून विद्यार्थी ये-जा करतात. गावात बस वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्याचप्रमाणे त्यांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा तक्रारी विद्यार्थी काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांचेकडे वारंवार घेऊन आल्याने, त्यांनी मुक्ताईनगर आगारात आगार प्रमुख यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविल्या देखील, परंतु बसेस संख्या कमी असल्याने नवीन बसेस उपलब्ध व्हावी त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण अडचणी संदर्भात आज विभागीय नियंत्रक जळगाव यांच्याशी बैठक घेत चर्चा केली. यात महत्त्वपूर्ण विषय म्हणजे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये ये जा करण्यासाठी वेळेवर बसेल उपलब्ध व्हाव्यात, तसेच बोदवड बस स्टैंड वर प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच उदळी, रनगाव, तासखेडा, रायपूर या मार्गांवर विद्यार्थ्यांकरिता वेळेवर बसेस उपलब्ध व्हाव्या, नवीन इलेक्ट्रिक बस व चार्जिंग स्टेशन तसेच अपघात टाळणे करिता चालकांची नियमित अल्कोहोल तपासणी करणे, अशा विविध विषयांवर आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक चर्चा. मतदारसंघात नवीन बसेस उपलब्ध होणे करिता महाराष्ट्र राज्य वाहतूक महामंडळ यांच्याशी सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर आगाराला नवीन बसेस उपलब्ध होतील, अशी माहिती स्वीय सहायक प्रवीण चौधरी व प्रशांत पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.