जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज

0

 

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. पोलिसांकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आरोप, आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जन आक्रोश आंदोलनानंतरही राज्य सरकराने आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्याने दोन दिवसांपासून जालन्यात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात पोलीस घुसले. यावेळी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला. आंदोलकांकडून दगडफेक झाली, असा आरोप पोलिसांचा आहे. जालना जिल्ह्यातील अंतर्वली गावात संबंधित घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळल्यानंतर पोलिस त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने त्याच्या काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. आरक्षण थेट जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. पण पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही लाठीमार व अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, अशी प्राथमिक माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.