दुष्काळ सदृश्य परिस्थिती व शेतकऱ्यांच्या समस्येबाबत भाजपा किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने जळगाव जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. वेळेवर पाऊस नसल्याने जमिनीत पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अश्या विविध मागण्याचे निवेदन भाजपा किसान मोर्चा तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात जनावरांना चाऱ्यासाठी बियाणे व मोफत खते मिळावे, तसेच ज्या ठिकाणी पावसाचा २१ दिवसाच्या खंड पडला आहे, अशा ठिकाणी २५ टक्के अग्रीम वाढीव पिक विमा परतावा रक्कम त्वरित शेतकऱ्यांना मिळावी. तांत्रिकदृष्ट्या निकष बसत नसले तरी प्रत्येक पीक पाणी करून प्रत्येक नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला विम्याची मदत मिळावी. सन २०१९-२०२२ मधील केळी नुकसान भरपाई रक्कम या ए.आय.सी कंपनीकडून बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नसून त्वरित मिळावी. सन २०२३ मे-जून मध्ये वादळ व गारपिट ने केळीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. शेतकऱ्यांचे इलेक्ट्रिक बिलची संपूर्ण माफी मिळावी. केळी पीक विमा संदर्भात सन २०२३-२४ साठी शेती भाडेपट्टा करारनामा पूर्वीचे झालेले असल्याने भाडेपट्टा करारनामा मागील प्रमाणेच ठेवण्यात यावा. पोर्टलच्या चुकीमुळे काही शेतकऱ्यांचे फळ पिक विमा 4.0 हेक्टरच्या दर निघालेले आहे. अशा शेतकऱ्यांना विमा व नुकसान भरपाई मिळण्यास पात्र धरण्यात यावे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके, जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सागर महाजन, राहुल महाजन, मनोज जावळे, विजय पाटील, हेमंत देवरे, विजय बाविस्कर, मिलिंद वाणी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.