राणांच्या आरोपांनंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; संजय पांडेंचं ट्विट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात सध्या हनुमान चालीसावरून झालेल्या घडामोडींवरून राणा दाम्पत्य चर्चेत आहेत. खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि अनुसूचित जातीमधील असल्यामुळे पाणी दिले नाही, तसेच कोठडीत हीन वागणूक मिळत असल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर केला होता.

दरम्यान राणांच्या आरोपानंतर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट करुन आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. राणा दाम्पत्याला पोलीस ठाण्यात चहा पिण्यासाठी दिला असून हासत हासत राणा चहा घेताना दिसत आहेत. आणखी काही करु शकतो का? असाही सवाल मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केला आहे.

खासदार नवनीत राणा यांनी सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केले आहे.यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान नवनीत राणा यांना अटक केल्यानतंर खार पोलीस ठाण्यात पोलिसांनी शिवीगाळ केला असल्याचा आरोप केला आहे. पाणी मागितल्यावर जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच अनुसूचित जातीमुळे पाणीसुद्धा देण्यात आले नाही. असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी व्हिडीओ ट्विट करत राणांचा दावा फेटाळला आहे. राणा पोलीस ठाण्यात चहा पीत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत राणा दाम्पत्य खार पोलीस ठाण्यात बसले असल्याचे दिसत आहेत. दोघांनाही चहा पिण्यासाठी दिली आहे. दरम्यान पिण्यासाठी पाणी मागितल्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप राणा यांनी केला होता. परंतु व्हिडीओमध्ये नवनीत राणा यांच्या समोर मिनरल वॉटर पाण्याची बाटली ठेवण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींनासुद्धा पोलीस ठाण्यात चहा देण्यात आली असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. संजय पांडे यांच्या व्हिडीओमुळे खासदार नवनीत राणांचा दावा खोटा असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.