विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन होणार -उदय सामंत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा या ऑफलाईन होण्याची दाट शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. यात विद्यापीठांशी चर्चा केल्यानंतर ऑफलाईन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑफलाईन परीक्षा जूनपर्यंत संपवण्याची सूचनाही सामंत यांनी केली असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान परीक्षा ऑफलाईन घेण्यावर चर्चा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे १ ते १५ जुलैदरम्यान विद्यापीठांकडून परीक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठांकडून करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली.

दरम्यान बैठकीनंतर सामंत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. “कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपरमध्ये दोन दिवसाचे अंतर असणार आहे, परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै पर्यंत होतील असे कुलगुरूंनी निश्चित केले आहे.”, असे उदय सामंत यांनी नमूद केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.