काय सांगता मोबाईलमध्ये सोनं ? काय आहे सत्य ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. अशातच तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या मोबाईलमध्ये सोनं आहे तर तुम्ही चकित झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र सध्या असा दावा केला जातोय की, या दाव्याने अनेकांनी आपले जुने मोबाईलही जपून ठेवले आहेत. पण यामागचे सत्य काय आहे ? ते आपण जाणून घेऊया.

दावा असा आहे की, तुम्ही वापर असलेल्या मोबाईलमध्ये सोनं असतं. त्यामुळे तुम्ही जर जुना झालेला मोबाईल फेकून देत असाल तर विचार करा. तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. हा दावा केल्यानं अनेकांना याबाबत आश्चर्य वाटू लागलं आहे. म्हणून खरंच मोबाईलमध्ये सोनं असतं का? असा प्रश्न अनेकांनी मोबाईल विक्री करणाऱ्यांना विचारला. तरीही अनेकांच्या शंकांचं निरसन झालं नाही.

या व्हायरल व्हिडीओचे सत्य जाणून घेण्यासाठी एक्सपर्टकडून माहिती घेतली.

काय आहे सत्य ?

सोनं गंजत नसल्याने स्मार्टफोनमध्ये थोडं सोने वापरतात. मोबाईल सर्किट बनवण्यासाठी सोन्याचा वापर करतात. मोबाईलमधील सोन्याची किंमत फक्त 50 ते 100 रुपये असेल. सोने काढण्यासाठी विशेष केमिकल्सचा वापर करतात. 1 ग्रॅम सोन्यासाठी 41 मोबाईल फोन लागतात.

सोनं फक्त मोबाईलमध्येच नसतं तर चांगल्या हेडफोनमध्ये, कॉम्प्युटरमध्ये, अगदी मोबाईलच्या सिममध्येही सोनं असतं. पण, ते सोने काढणे सहज शक्य नाहीये. सोनं काढण्यासाठी काही विशेष केमिकल्स वापरली जातात. ते किंचितच असल्याने त्याचा जास्त फायदाही नाही. पण, आमच्या पडताळणीत मोबाईलमध्ये सोनं असते हा दावा सत्य ठरला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.