नुकसानग्रस्त भागाची खा. रक्षा खडसेंनी केली पाहणी

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

१८ मार्च रोजी रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील खिर्डी शिवार, धामोडी शिवार, भांबलवडी शिवार, वाघाडी शिवार, रेंभोटा शिवार, निंबोल शिवार ई. ठिकाणी पिकांची व राहत्या घरांची मोठ्या प्रमाणवर हानी झाली असून, यामुळे शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत आज नुकसानग्रस्त भागाची खा. रक्षा खडसे यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांसह पाहणी करून नुकसानी बाबत माहिती घेतली.
यावेळी त्यांनी तत्काळ पंचनामे करणे बाबत संबंधितांना निर्देश दिले. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धिर दिला व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खा. रक्षा खडसे यांच्यासह महसूल नायब तहसीलदार मयूर कळसे, तलाठी निलेश पाटील, नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन, राजन लासूरकर, सुनिल पाटील, महेश चौधरी, रामदास पाटील, शुभम पाटील, रवींद्र पाटील, नितीन पाटील, सोनू पाटील, भूषण पाटील, जयचंद पाटील, लखन पाटील, दुर्गेश पाटील, गोरख पाटील, रामचंद्र पाटील, किरण नेमाडे, अतुल पाटील, मीना तडवी इ. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.