अंगावर घाण पडली सांगत चोरट्याने बॅगच लांबवली…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील बस स्थानक परिसरात एका इसमाला त्याच्या अंगावर घाण पडली असे सांगून त्याच्या जवळील तब्बल पंन्नास हजार रुपये ठेवलेली बॅग आज्ञात चोरट्यानी लांबविल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की, भुसावळ येथील रहिवासी असलेले रिकव्हरी सेल्समन गुलामगौस इलीयास शेख हे दुपारी बस स्थानक परिसरात मोबाईल दुकानातून वसुली करून मोटर सायकलीवर बसले, यावेळी एका अज्ञात इसमाने “आपके पिछे गंदगी गिरि है” असे म्हणत सेल्यमनने मागे वळून बघीतले तेवढ्यात मोटर सायकलच्या पेट्रोल टाकी वर ठेवलेली बॅग घेऊन तो आज्ञात इसम पसार झाला. या बॅग मध्ये वसुली केलेले तब्बल एकोणपन्नास हजार (४९०००) होते.
याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गुलामगौस इलीयास शेख रा भुसावळ यांच्या तकारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास पो.ना. नावेद अली हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.