पुणेकर घेणार मोकळा श्वास, सुरु होणार हवेतून चालणाऱ्या बसेस

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पुण्यातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. पुणेकरांनी वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बसचा वापर करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले आहे. यावेळची गडकरी यांनी पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कचरामुक्त पुणे होण्यासाठी अनेक उपाय सुचवले आहे. पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या, असे देखील गडकरी यावेळी
म्हणाले.

पुनरकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे, म्हणजे कोंडीपासून पुणेकर मोकळा श्वास घेणार आहे. कारण चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण आज झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकात मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले.

काय म्हणले नितीन गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित पवार (Ajit Pawar) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विनंती आहे की, एकदा याचे प्रेझेंटेशन बघावे. हवेतून चालणारी बस ही पुण्यातील वाहतूक कोटीवर हा चांगला पर्याय आहे. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये दोन-तीन मजली उड्डाणपूल आहे. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बस आपण येथे आणणार असून या बसमधून एका वेळेस २५० प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

नितीन गडकरी म्हणाले, माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे, की एकदा याचे एकदा प्रेझेंटेशन पहावे. हवेतून चालणारी बस ही पुण्यातील वाहतूक कोंडीवर हा चांगला पर्याय आहे. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बस आपण येथे आणणार असून या बसमधून एका वेळेस 250 प्रवाशांन प्रवास करता येणार आहे.

भारतातून पेट्रोल, डिझेल हद्दपार करायचे आहे
वाहनांची संख्या वाढल्याने त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. यामुळे प्रदूषण अतिप्रमाणात वाढले आहे. पुण्याला पेट्रोल, डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. मला भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचे आहे. त्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल, आणि हायड्रोजन याचा वापर वाढावा. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करून नका, तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा, ग्रीन हायड्रोजन तयार करा, ग्रीन हायड्रोजन हेच भविष्य असल्याचे नितीन गडकरी म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.