एकवेळेस ‘गदर २’ नाही पहिला तरी चालेल, पण एकदा ‘ओएमजी २’ नक्की पहा

सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे #OMG2ForEveryone

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘अक्षय कुमार’च्या ‘ओएमजी २’ (OMG 2) ला भलेही गदरपेक्षा कमी ओपनिंग मिळाली असेल पण, त्याच्यातील कंटेंटन मात्र चाहत्यांना विचार करण्यास भाग पाडेल असा आहे. पौगंडावस्थेत मुलांना द्यावं लागणार लैंगिग शिक्षण याकडे ‘ओएमजी २’ ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सनी देओल भारत पाकिस्तानमधील प्रेमकथा प्रेक्षकांपुढे सादर करण्यात व्यस्त आहे. पण दुसरीकडे अक्षयने पुन्हा एकदा सोशल मेसेज देत, एक वेगळीच कलाकृती समोर आणली आहे. ओएमजीच्या पहिल्या भागात देखील त्यानं देवभोळेपणा, त्याचा फायदा घेणारे काही लोक आणि देवाच्या नावाखाली होणारी फसवणूक या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे.

अक्षयने नवीन विषय घेऊन चित्रपटाच्या विषयातील नाविन्य अक्षयनं जपलं आहे. त्याने रक्षाबंधन, पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा, गब्बर इज बॅक या चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी देखील त्याने त्याच्या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. शाळांमधून लैगिक शिक्षण द्यायला हवे, त्याची माहिती किंवा ते शिक्षण मिळाल्याने कोणत्या धोक्यांना सामोर जावं लागेल याविषयी त्यानं भीती व्यक्त केली आहे.

अक्षयच्या ओएमजी २ वर जाणकार प्रेक्षक, समीक्षक यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी शोषलं मिडीयावरून त्याच्या नव्या चित्रपटातील विषयाची प्रशंसा केली आहे. एकवेळ सनी देवळाचा गदर नंतर पहा पण, त्यापूर्वी अक्षयचा ओएमजी २ नक्की पहा, अशा प्रतिक्रिया ट्विटरद्वारे प्रेक्षकांनी दिल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.