Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक; स्वत:वर पेट्रोल टाकून पोलीस प्रेयसीला मनवत होता; प्रेयसीनेच माचिसची काडी पेटवून त्याला…
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक; स्वत:वर पेट्रोल टाकून पोलीस प्रेयसीला मनवत होता; प्रेयसीनेच माचिसची काडी पेटवून त्याला…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 21, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्या मैत्रिणीने पेटवून दिले. जखमी पोलिसाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. संजय असे मृताचे नाव असून राणी या होमगार्डसोबत त्याचे नाते होते. दोघेही बेंगळुरू येथील बसवानगुडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

    संजय त्याच्या मैत्रिणीला समजवायला गेला होता

    अलीकडे राणी संजयपासून दूर राहू लागली होती. संजयने तिला दुसऱ्या व्यक्तीशी चॅट आणि फोन करताना पाहिले. बुधवारी संजय राणीची समजूत घालण्यासाठी गेला असता दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. तिने समेट करण्यास नकार दिल्यास स्वत:ला पेटवून घेण्याची धमकी संजयने हातात पेट्रोल घेऊन दिली. त्यानंतर स्वत:वरही पेट्रोल ओतून घेतले. त्याचवेळी राणीने माचिसची काडी पेटवली आणि त्याला जाळून टाकले. नंतर परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून राणीने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि संजयला दुचाकीवरून व्हिक्टोरिया रुग्णालयात नेले. मात्र गुरुवारी पहाटे संजयचा मृत्यू झाला.

    संजयच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की राणीने त्याला जाणूनबुजून आग लावली, परिणामी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतःचे कुटुंब असूनही संजयचे राणीसोबत संबंध होते. या घटनेप्रकरणी पुत्तेनहल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    #crime #murder #police Karnataka
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक

    May 18, 2026

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    नाशिकमधील अनेक मोठे मासे आता सीबीआयच्या रडारवर

    May 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif