Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री ठाकरे भडकले
    महाराष्ट्र

    मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री ठाकरे भडकले

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 14, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आणि मुंबई दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहू येथील तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण केल्यानंतर मोदी आपल्या हेलिकॉप्टरद्वारे मुंबईसाठी रवाना झाले.

    मुंबईतील आयएनएस शिक्रा पाँईटवर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहिले होते. यावेळी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनातून शिक्रा पाँईटवर पोहोचले होते.

    दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित प्रकार घडल्यानंतर उद्धव ठाकरे सुरक्षा यंत्रणांवर भडकल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांचं शिक्रा पाँईंटवर आगमन झाल्यानंतर, प्रोटोकॉलनुसार सुरक्षा यंत्रणांनी केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुढे जाण्यास परवानगी दिली आणि आदित्य ठाकरे यांना वाहनातून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.

    यावेळी उद्धव ठाकरे सुरक्षा यंत्रणांवर भडकले, त्यानंतर आदित्य ठाकरे यांना देखील पुढे प्रवेश देण्यात आला. पंतप्रधान मोदी आज मुंबईतील राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या ‘जलभूषण’ या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन व द्वारपूजन करणार आहेत. तसेच राजभवन येथील ऐतिहासिक श्रीगुंडी मंदिराला देखील ते प्रथमच भेट देणार आहेत.

     

    aditya thackeray Chief Minister Uddhav Thackeray Dehu Deputy Chief Minister Ajit Pawar Governor Bhagat Singh Koshyari Mumbai pm narendra modi PM Narendra Modi in Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif