पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्यातील राजकारणातील भुकंपानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे एकाच मंचावर दिसू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना १ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर दोन्ही नेते प्रथमच एकत्र येणार आहेत.

मोदींना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहणार उपस्थितीत राहणार आहेत. याच कार्यक्रमचं आमंत्रण शरद पवार यांनाही देण्यात आलं आहे.

यातच राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासोबत मंचावर दिसू शकतात. असं असलं तरी शरद पवार यांनी अद्याप या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.