१२ आमदारांच्या प्रकरणात ‘या’ दिवशी सुनावणी, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात उद्याच म्हणजे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या पाठीसमोर उद्या केस लिस्ट आहे. सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना कोर्टात स्थगिती स्थागिती देण्यात आली आहे. आता मंगळवारी हि स्थागिती उठणार कि कायम राहणार याची उत्सुकता आहे. या आधी न्यायमूर्ती जोसेफ यांच्यासमोर ही केस सुरु होती. पण ते नियुक्त झाल्यांनतर आता ही केस सरन्यायाधिशांसमोर सुनावणीसाठी आली आहे.

शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या १२ सदस्यांनी यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे सरकारकडून नवीन यादी सादर करण्याची तयारी सुरु झाली. या १२ नावांसाठी दोन्हीकडून जोरदार लॉबिंग सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. आमदारांचा संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या १२ नावांमध्ये नेमकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्यासमोर आहे. २०१९ च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसंच शिंदे आणि फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात सत्ता बदलानंतर याबाबत एक वेगळी याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आधीची यादी परत पाठवली. हे कृत्य नियमात बसणारं नाही, असं म्हणत याबाबत कोर्टात आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता त्यावर काय निर्णय होतो हे मंगळवारी कळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.