‘कंपाइलर डिजाइन फंडामेंटल्स’ विषयावर रायसोनी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे पुस्तक प्रकाशित…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचे विभाग प्रमुख प्रा. रफिक शेख, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सच्या विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, प्रा. रुपाली ढाके व प्रा. करिश्मा चौधरी यांनी लेखन केलेल्या “कंपाइलर डिजाइन फंडामेंटल्स” या पुस्तकाचे प्रकाशन रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

अनेक विद्यार्थी हे अभ्यासाठी अनेक परदेशी लेखकांच्या पुस्तकावर अवलंबून असतात. मात्र स्थानिक प्रेसमधून अशा प्रकारचे पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे ही चांगली बाब असल्याचे कौतुकोद्गार प्रितम रायसोनी यांनी यावेळी काढले. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस स्थित्यंतर आणि अनेक बदल होताना दिसतात, कालपरत्वे विद्यार्थ्यांच्याही अपेक्षा असतात की त्यांना त्यांच्या महाविद्यालयांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे याचाच मागोवा घेवून प्रा. रफिक शेख, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. रुपाली ढाके व प्रा. करिश्मा चौधरी यांनी लिहिलेले हे पुस्तक विध्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी लेखक प्राध्यापकांनी पुस्तकाची माहिती देतांना सांगितले कि, कंपाइलर डिझाइन म्हणजे काय? , कंपाइलरचे टप्पे, प्रक्रिया आणि पायऱ्या, लेक्सिकल अॅनालिसिस म्हणजे काय?, यासहीत या पुस्तकात इंट्रोडक्शन, ग्रामर, पार्सिंग, सिंटेक्स डायरेक्ट ट्रान्सलेशन, सिम्बॉल टेबल, कोड ऑप्टिमायझेशन, कोड जनरेशन, ऍडमिनीस्ट्रेशन आदीची बेसिक नॉलेजची इत्यंभूत माहिती दिली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.