पारोळा बस स्थानकातून महिलेचा ६९ हजाराचा ऐवज लंपास…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा तालुक्यातील देवगाव येथील महिलेचे रोख रकमेसह ६९ हजार रुपयांचे दागिने पारोळा बस स्थानकातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलीस ठाण्यात संजीवनी प्रदीप पाटील (३२) यांनी फिर्याद दिली की दिनांक. २५ रोजी सायंकाळी पारोळा बसस्थानक येथे साठ हजार रुपये किमतीचा सोन्याचा चपला, हार पाच हजार रुपये किंमतीची चांदिचे ब्रेसलेट व करधोडा, तीन हजार रुपये किंमतिची सोन्याची नथ, एक हजार रुपये रोख असे एकुण ६९ हजार रुपये किमतीच्या ऐवज कोणीतरी अज्ञाताने बस मध्ये चढताना चोरून नेला आहे. सदर महिला ही पारोळा ते चाळीसगाव बसने देवगाव येथे जात असताना सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रुपये फिर्यादीचे पर्स मधुन चोरुन नेले आहे. महिलेच्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.