भोलाणे येथे पोस्ट ऑफिससह दोन ठिकाणी  चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा तालुक्यातील  भोलाणे गावात तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने ग्रामस्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान एकाच गावात तीन ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून सोने चांदीचा रोकड लंपास केले आहे.

याबाबत पावडा पोलिसात भगवान पाटील यांनी फिर्याद दिली की, तारीख २५ मे ते २६ मे रोजीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून एक लाख ९५ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केली. याचबरोबर गावातील परमेश्वर पाटील यांच्या घरातून ४३ हजार पाचशे किमतीचे दागिने सह रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी काढून पोबारा केला. तसेच गावातील पोस्ट ऑफिस येथून  31 हजार 800 रुपये घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले.

गावात दोन घरांसह पोस्ट ऑफिस मध्ये चोरी झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले असून याबाबत चोरट्यांविरुद्ध तपासचक्रे फिरवत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटने प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.