दुकानदाराच्या गळ्याला चाकू लावून पैसे लुटले !

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क

जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार चाकू दुकानदाराच्या गळ्याला लावून खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढूनजीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ घडला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली . मनोज उर्फ आर्यमान मंगल बिऱ्हाडे रा. राजाराम नगर, अमळनेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

ज्ञानेश्वर रतन सासोटे (वय-४६), रा.भोईवाडा, पैलाड, हे प् ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वर सासोटे हे त्यांच्या लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे त्यांच्या दुकानात असताना मनोज उर्फ आर्यमान मंगल बिऱ्हाडे हा तिथे आला. जुन्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली आणि हातातील चाकू गळ्याला लावून ज्ञानेश्वर सासोटे यांच्या खिशातून दीड हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून जीवेठार मारण्याची धमकी दिली. ज्ञानेश्वर सासोटे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या नुसार शुक्रवार ७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी मनोज उर्फ आर्यमान मंगल बिऱ्हाडे यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यालाअटक केली आहे. सहायक फौजदार कुमावत तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.