जळगावात एकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला ; एक जण ताब्यात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

वाहन चालकाला रस्ता अडवून मारहाण करून त्याचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना पिंप्राळा येथील आठवडे बाजारात घडली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी तीन जण फरार असून तुफान रघु रिखीयासन वय २० याला पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव शहरातील दादावाडी परिसरात वृंदावन पार्क येथे लखीचंद वामन बडगुजर वय 56 राहत असून ते ७ रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथील आठवडे बाजार परिसरातून जात असताना तीन ते चार जणांनी त्यांना अडवून चापटा बुक त्यांनी मारहाण केली. तसेच लकीचंद बडगुजर यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. . याप्रकरणी लक्षण बडगुजर यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चार संशयित निष्पन्न झाले असून ते सर्व झारखंड राज्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.