रावेर तालुक्यात तरुणाचा खून ; निमड्या गावाजवळील घटना

0

रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क

एका 32 वर्षीय तरुणाचा त्याच्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर रावेर तालुक्यातील निमड्या गावाजवळ खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. संजय बारेला (32, निमड्या, ता.रावेर) असे खून झालेल्याचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. बारेला यांचा खून कुणी व का केली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

निमड्या गावापासून जवळच संजय बारेला यांचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना शनिवारी सकाळी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली. घटनास्थळी डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून खुनाच्या घटनेमुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.