विवाहितेचा ५० हजारांसाठी छळ

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

माहेरहून ५० हजार रुपये आणावेत यामागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या ५ जणांविरुद्ध एमआयडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नयना प्रदीप राठोड वय २५ यांचा यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव करजगाव येथील प्रदीप शंकर राठोड यांच्याशी विवाह झाला असून नयना तिचे पती यांनी नयना हिच्या ननंद कडून पन्नास हजार रुपये घेतले होते या पैशांची परतफेड करण्यासाठी नयना हिने तिच्या माहेरून पन्नास हजार रुपये आणावेत अशी मागणी पतीसह सासरच्या मंडळींनी केली. तसेच या कारणावरून वेळोवेळी नयना तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
याबाबत नयना राठोड हिने शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती प्रदीप शंकर राठोड ,सासू यशोदा शंकर राठोड , जेठ बलदेव शंकर राठोड, पुनम बलदेव राठोड , नणंद कविता राजू आढे, सर्व रा . पिंपळगाव पोस्ट करजगाव ता. दारव्हा जि. यवतमाळ या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.