प्रा.राजेंद्र चिंचोलेंच्या “सारथी” पुस्तकाचे “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे” यांच्या हस्ते प्रकाशन

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

दीपस्तंभ प्रकाशनाच्या प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित स्पर्धा परीक्षा “सारथी” या स्पर्धा परीक्षा विषयीची माहिती असणाऱ्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या हस्ते मुख्यमंत्री दालनात (मुंबई) येथे करण्यात आले. प्रा.राजेंद्र चिंचोले यांच्या नवीन “सारथी” पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच नामदार संजय राठोड, माजी मंत्री सदाभाऊ खोत, पाचोर-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, आमदार संजय गायकवाड, प्रा.राजेंद्र चिंचोले, स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील, दीपस्तंभ प्रकाशनाचे वितरण प्रमुख जगदीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. प्रा.राजेंद्र चिंचोले राबवित असलेल्या स्पर्धा परीक्षा विषयीच्या विविध उपक्रमाची माहिती आमदार किशोर पाटील यांनी विषद केली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आरसा आहे. केंद्रीय व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती असणारे हे पहिलेच पुस्तक आहे. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण तज्ञ, पालक यांना अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

प्रा. राजेंद्र चिंचोले २६ वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतात. ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव (हरेश्वर) येथे भौतिक शास्त्र विषयाचे अध्यापन करतात. ग्रामीण भागातील पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ज्ञानप्रबोधिनी मंडळ, पाचोरा, या ठिकाणी त्यांनी सुरू केले. विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक व करिअर कौन्सिलर म्हणून ते काम पाहतात. स्पर्धा परीक्षांवर ५०० पेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी दिली असून प्रा. राजेंद्र चिंचोले यांच्या मार्गदर्शनाने वर्ग-१ व वर्ग-२, वर्ग-३ पदी ५५० पेक्षा जास्त विद्यार्थी कार्यरत आहे. विविध वृत्तपत्रांमधून राज्यभर लेखमालिकेच्या माध्यमातून त्यांचे आतापर्यंत ६५० पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षांवरील लेख प्रकाशित झाले आहेत. इयत्ता अकरावी व बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात भौतिकशास्त्र विषयाचे लेखन मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले असून सद्यस्थितीत राज्य स्तरावर व विभाग स्तरावर भौतिक शास्त्र विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते काम पाहत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.