लायकी पेक्षा जास्त बोलू नका; राणेंनी केसरकरांना फटकारले (व्हिडीओ)

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे गटाने भाजपचा (BJP) पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. मात्र आता शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची माहिती समोर आलीय. कोकणातील दोन नेते, भाजपचे निलेश राणे (Nilesh Rane) आणि शिंदे गटाचे दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यात नवा वाद समोर आला आहे.

राणेंची दोन्ही मुलं लहान

दीपक केसरकर यांनी राणेंची दोन्ही मुलं लहान आहेत, त्यांना समज देण्याची गरज असल्याचे म्हटले होते, यानंतर निलेश राणे यांनी यासंबंधी ट्वीट केले आहे. ते म्हणाले आहेत की, दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका, त्यानंतर त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा, असे लिहीत एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे.

युती टिकायची जबाबदारी दोघांवर

निलेश राणे यांनी त्या व्हिडीओमध्ये केसरकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले आहेत दीपक केसरकर आपण युती मध्ये आहोत हे विसरू नका, जेवढी युती टिकायची जबाबदारी आमच्यावर आहेत तेवढी तुमच्यावर देखील आहे, तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असू शकता आमचे नाही, असे निलेश राणे यांनी म्हणाले आहे.

काय म्हणाले केसरकर ?

यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे, ते म्हणाले की, नारायण राणेंची मुलं लहान आहेत आणि त्यांना समजवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतील. ते काय ट्वीट करतात ते मी वाचत नाही. लहान-लहान मुलं ट्वीट करत राहतात, लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात, कोणी गांभिर्याने त्याच्याकडे बघत नाही, पण हे एवढं गंभीर असेल तर मी महाराष्ट्रात गेल्याबरोबर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालेल ते त्यांना समज देतील आणि ते सुधारतील. ते शत्रू थोडेच आहेत, असेही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.