कॅनडात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

0

कॅनडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कॅनडामधून (Canada) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅनडातील एका हिंदू मंदिरात बसवण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी तोडफोड (Mahatma Gandhi Statue Vandalized) केली. या घटनेनंतर लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भारतीय दूतावासाने तिथल्या सरकारसमोर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

स्थानिक पोलीस या प्रकरणाचा द्वेषमूलक गुन्हा म्हणून तपास करत आहेत.ओन्टारियो प्रांतातील रिचमंड हिल शहरातील विष्णू मंदिरात (Vishnu temple in Richmond Hill) स्थापन करण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या पाच मीटर उंच पुतळ्याची समाजकंटकांनी तोडफोड केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोरांनी पुतळ्यावर पहिले अपशब्द लिहिले.

दरम्यान, याप्रकरणाची तक्रार स्थानिक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट केले आहे की, “भारतीय समुदायाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असलेल्या या द्वेषपूर्ण गुन्ह्यामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. यामुळे येथील भारतीय समुदायामध्ये चिंता आणि असुरक्षितता वाढली आहे. आम्ही तपास करण्यासाठी आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी देण्यासाठी कॅनडाच्या सरकारशी संपर्क साधला आहे.”

टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या ( Consulate General of India in Toronto Canada ) अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले आहे, “रिचमंड हिल येथील विष्णू मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विध्वंसामुळे आम्हाला दुःख झाले आहे. तोडफोडीच्या कृत्याने कॅनडामधील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.’

कॅनडामध्ये भारतीय समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या घटनेमुळे स्थानिक भारतीयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. सध्या स्थानिक पोलीस तक्रार नोंदवून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.