राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे..

जिल्ह्यानुसार दिलेले अलर्ट 

रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे

ऑरेंज अलर्ट – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर

यलो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

आज सकाळी 12.33 वाजता मुंबईतील समुद्रात 4.82 मीटर उंचीच्या भरतीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबई आणि मुंबईच्या लगतच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.