BREKING : पंतप्रधानांवरील अविश्वास प्रस्तावासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून व्हीप जारी

0

नवी दिल्ली ;- विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. तसेच लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या प्रस्तावावर मतदान होणार असून मतदानासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या खासदारांसाठी व्हीप काढण्यात आला आहे. अजित पवार गटाकडून खासदार सुनिल तटकरे यांनी तर शरद पवार यांच्या गटाकडून मोहम्मद फझल यांनी व्हीप जारी केला आहे.

अविश्वास प्रस्तावार दोन दिवसापासून चर्चा सुरू आहे, आता या प्रस्तावावर आज मतदान होणार आहे. शरद पवार यांच्या गटाकडून खासदार मोहम्मद फैजल यांनी व्हीप बजावला आहे. शरद पवार यांच्या गटात लोकसभेत सप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल हे सदस्य आहेत. तर अजित पवार यांच्या गटात सुनिल तटकरे हे एकच सदस्य आहेत. तटकरे यांनी काढलेल्या व्हीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने मतदान करण्याची सूचना देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या गटाकडून काढलेल्या व्हीपमध्ये मोदी सरकार विरोधात मतदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता लोकसभा अध्यक्ष कोणत्या गटाचा व्हीप अधिकृत असल्याची मान्यता देतात यावर सर्व अवलंबून आहे. आता हे दोन गट एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाने दाखल केलेल्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूूक आयोगाने पाठवलेल्या नोटीसला शरद पवार गटाने उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन गट नाहीत. शरद पवारच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा करणे हे चुकीचे असल्याचे शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.