गोंडगाव येथील पीडित कुटुंबाला आझाद मिञ मंडळातर्फे मदत

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या पीडित कुटुंबाला मदत म्हणुन भडगाव शहरातील आझाद मित्र मंडळाने 11 हजाराची रोख स्वरूपात मदत केली आहे.

या बाबत महिती अशी की, भडगाव शहरातील बाजार चौकातील आझाद मित्र मंडळातर्फे दि. 5 रोजी मंडळांचे पाट पूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मोठया उत्साहात करण्याचे मंडळाने आयोजित केले होते. परंतू गोंडगाव येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे या कार्यक्रमाची रूपरेषा कमी करत साध्या पद्धतीने कार्यक्रम घेउन मंडळाने 11 हजार रु. हे पीडित कुटुंबाला मदत म्हणुन दिले. यावेळी आझाद मित्र मंडळाचे अविनाश पुंडलिक अहिरे, मिलिंद अहिरे, सुधीर अहिरे, स्वप्नील भोई, ललित धनगर, विशाल भोई, निलेश भोई, गोपाल भोई, चेतन भोई, अनिल कुंभार, रवी भोई, शुभम बागुल, तुषार भोई आदि सह मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.