नवाब मलिकांची प्रकृती गंभीर; वकिलांनी दिली कोर्टात माहिती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मलिक यांची तीन दिवसांपासून प्रकृती खराब असल्याची माहिती वकिलांनी विशेष पीएमएलए कोर्टात दिली.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. मात्र ईडीने जामीन अर्जाला विरोध केला आहे. नवाब मलिक यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

याआधी शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला, तर पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 6 मे पर्यंत वाढवली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्याअंतर्गत उच्च न्यायालयाने त्यांच्या तात्काळ सुटकेचा अंतरिम अर्ज फेटाळला होता. ईडी मलिक यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण मलिकचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संलग्न मालमत्तांच्या खरेदीत पैशाच्या गैरवापराशी संबंधित आहे. ईडीच्या वकिलांनी यावेळी सांगितले की, कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या प्रकरणांसाठी विशेष न्यायालय कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आरोपपत्राची दखल घेईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.