मनसेची अक्षय तृतीयेला होणारी महाआरती स्थगित

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

मनसेकडून उद्या पुण्यात होणारा महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत याची माहिती दिली. मनसे, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी एकत्र येऊन ३ मे रोजी पुण्यातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये भोंगे लावून आरती करण्यात येईल, असं जाहीर केलं होतं. उद्या ईद असल्याने महाआरती करू नका , असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

मनसेचा पुण्यातील अक्षय्य तृतीयेला आयोजित करण्यात आलेल्या महाआरती करण्याचा निर्णय स्थगित झाला आहे. मनसे आणि हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वतीने पुण्यात प्रत्येक शाखेत महाआरती करण्यात येणार होती. उद्या रमजान ईद आहे. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय सध्यातरी स्थगित करण्यात आला आहे. मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी मनसे अधअयक्ष राज ठाकरे यांनी तीन मेचा अल्टिमेटम दिला होता.

त्यानंतर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचेही आव्हान दिले होते. तर तीन तारखेला मनसेतर्फे महाआरती आयोजित करण्यात आली होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार या महाआरतीचा कार्यक्रम सध्यातरी स्थगित करण्यात आला आहे. मनसेच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.