महिला ग्रामपंचायत सदस्याचा विनयभंग करून धमकी

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील एका गावातील महिला ग्रामपंचायत सदस्याचा विनयभंग करून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिला ही ग्रामपंचायत सदस्य आहे. १ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महिला ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत कार्यालयात असतांना गावातील बापूराव रामराव देवकर आणि अनंतराव रामराव देवकर यांनी कारण नसता शिवीगाळ केली. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेच्या सासूला देखील मारहाण करून गळ्यातील सोन्याची होत तोडून नुकसान केले तर ग्रामपंचायत सदस्याला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आलीय.

याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेने पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून संशयित आरोपी बापूराव रामराव देवकर आणि अनंतराव रामराव देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.