केळी घेण्यावरून दोन जणांवर चाकूहल्ला; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे केळी घेण्यासाठी गेलेल्या दोन जणांवर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील अक्सानगर, मेहरूण येथील रहिवासी अजहर खान इकबाल खान (वय २८) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह राहतात. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार १ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता अजहर खान हा मित्र अशरफ खान याच्यासोबत मास्टर कॉलनीतील चटोरी गल्लीत केळी घेण्यासाठी गेले. दरम्यान केळी विक्रेत्याकडे शेवटचे दोन डझन केळी शिल्लक होती ते अजहर खान याने खरेदी केली.

त्याठिकाणी दानिश पिरजादे, पप्पू पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकिम पिरजादे आणि रहिम पिरजादे यांनी केळी आम्ही घेतल्याचे सांगून शिवगीळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दानिश पिरजादे यांने खिश्यातून चाकू काढून अशरफ खान आणि अजहर खान यांच्यावर वार करून जखमी केले.

या मारहाणीत जखमी झालेल्या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अजहर खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दानिश पिरजादे, पप्पू पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकिम पिरजादे आणि रहिम पिरजादे सर्व रा. मास्टर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.